Friday, December 18, 2009

ek Mast kavita

ना ‘शरदा’चे चांदणे
ना ‘सोनिया’चे दिस
‘
घडय़ाळा’चे ओझे ‘हाता’ला
म्हणून ‘आय’ कासावीस

‘कमळा’च्या पाकळ्यांची
यादवी छळते मनाला
‘
धनुष्य’ आलंय मोडकळीस
पण जाणीव नाही ‘बाणा’ला

विळा, हातोडा अन् कंदिलाला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढू शकेल एवढी
‘
रेल्वे इंजिना’त जान नाही.

मन आहे ‘मुलायम’
पण ‘माया’ कुठं दिसत नाही
‘
हत्ती’वरून फिरणारा
‘
सायकल’वर बसत नाही

कितीही उघडी ठेवा ‘कवाडे’
पण ‘प्रकाश’ आत जाणार नाही
विसरलेले ‘आठवले’ तरीही
‘
गवई’ गीत ‘गाणार’ नाही

‘बंडखोर’ ‘पक्षां’चा थवा
‘
पार्टी’साठी आतूर
कुंपणच खातंय शेताला
अन् बुजगावणही फितू


अ‍ॅड. अनंत खेळकर, अकोला

No comments:

 
Locations of visitors to this page